जेईई उत्तीर्ण विद्यार्थी मुक्तशाळेत नापास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पुणे - मुलाने आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्याला घरी राहून अभ्यास करता यावा म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमध्ये (एनआयओएस) प्रवेश घेतला. त्याने बारावीची (विज्ञान) परीक्षा दिली. निकालाने मात्र त्याला मानसिक धक्काच दिला आहे. जेईई मेन उत्तीर्ण होणाऱ्या माझ्या मुलाला ‘एनआयओएस’ने नापास ठरविले आहे. त्याच्या काळजीने आम्ही त्याला क्षणभरही एकटे राहू देत नाही... मुक्तशाळेद्वारे परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याचे पालक सत्येंद्र प्रसाद यांची ही व्यथा आहे.

 प्रसाद यांच्यासारखे अनेक पालक कोथरूडमधील संस्थेच्या कार्यालयात चकरा मारू लागले आहेत. निकाल चुकीचा असल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. प्रसाद यांच्या मुलाला भौतिकशास्त्र विषयात गैरहजर दाखविण्यात आले, तर रसायनशास्त्रात सहा गुण मिळाले. जेईई-मेन उत्तीर्ण होऊन जेईई ॲडव्हान्स्ड देणाऱ्या विद्यार्थ्याला एवढे कमी गुण कसे मिळतील, असा त्यांचा सवाल आहे. 

विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ 
श्‍वेता यादव या विद्यार्थिनीनेही विज्ञान शाखेची बारावीची परीक्षा दिली. ती म्हणाली, ‘‘रसायनशास्रात मला ऐंशीपैकी केवळ सहा गुण मिळाले आहेत. अन्य सर्व विषयांत ३५ पेक्षा अधिक गुण असताना या विषयात कमी कसे? अन्य काही मुलांना तर परीक्षा देऊनही गैरहजर दाखविले आहे. ‘एनआयओएस’ने उत्तरपत्रिका तपासताना चूक केली आहे. आमच्या आयुष्याशी ही यंत्रणा खेळत आहे.’’

निकाल चुकीचा असल्याच्या २५ तक्रारी आल्या आहेत. मात्र, उत्तरपत्रिकांची तपासणी पुण्यात होत नाही. त्यामुळे निकालात इथे बदल होणार नाही. हे काम ‘एनआयओएस’च्या गुजरात विभागात झालेले आहे. तेथील कार्यालयाकडे सर्व तक्रारी आम्ही पाठवत आहोत. तेथे फेरतपासणी होईल.
- दिलीपराज नंदनवार, प्रशासकीय अधिकारी, एनआयओएस

Web Title: JEE passed student fails to NIOS