जीप आणि टेम्पो अपघात एक ठार, चार जखमी

पराग जगताप
रविवार, 29 जुलै 2018

ओतूर (जुन्नर) : नगर कल्याण महामार्गावर वाटखळे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत जीप व टेम्पोची धडक होऊन एक ठार तर चार जखमी झाले आहेत. या अपघातात विनीत शांताराम गाढवे (वय. 28 रा. ओतूर ता.जुन्नर) हा ठार झाला असुन हर्षल शिरसाठ, शिवाजी दिघे, मिलींद साळव, पंडित घाडगे हे जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहित अशी कि मढकडुन ओतूरकडे येणारी बोलेरो (गाडी क्र.एम.एच.04 एफ.एफ.5793) ह्या गाडीला ओतूरकडुन कल्याण बाजुला चाललेल्या आयशर टेम्पो (एम.एच.46 ए.आर.5700) यांच्या मध्ये शुक्रवारी सायंकाळी 4.30 दरम्यान नगर कल्याण महामार्गावर वाटखळजवळ समोरा समोर अपघातात  सर्व जखमी झाले.  उपचारा दरम्यान गाढवे यांचा मुत्य झाला. याबाबत पुढिल तपास ओतूर पोलिस करीत आहेत.

Web Title: Jeep and tempo accident One killed four injured