जेजुरीचा खंडोबा गड गुलमोहराने खुलला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

जेजुरी - नुकत्याच झालेल्या पावसाने जेजुरीच्या खंडोबा गडावरील गुलमोहराची झाडे लाल-पिवळ्या फुलांनी बहरू लागली आहेत. त्यामुळे जेजुरीचा गड भर उन्हातही खुलून दिसत आहे.

यंदा उन्हामुळे गुलमोहर बहरण्यास वेळ लागला. दरवर्षी उन्हाळ्यात ही फुले फुलतात. कडक उन्हातही गडाचे सौंदर्य त्यामुळे खुलून दिसते. यंदा दोन दिवसांपूर्वी बावीस मिलिमीटर पाऊस जेजुरीत झाला. त्यामुळे गुलमोहराची झाडे तरारली. कळ्यांचे रूपांतर फुलामध्ये झाले. तसे गडाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले. फुलांनी बहरलेला गड व परिसर भाविकांनी आकर्षित करीत आहेत.

Web Title: jejuri khandoba gad gulmohar