विश्‍वस्त नेमणुकीविरोधात जेजुरीत बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 डिसेंबर 2017

जेजुरी - श्री मार्तंड देवसंस्थान विश्‍वस्तांच्या नेमणुकीमध्ये स्थानिकांना प्राधान्य न दिल्याच्या निषेधार्थ जेजुरीत मंगळवारी बंद पाळण्यात येऊन निषेध सभा घेण्यात आली. अत्यावश्‍यक सेवा वगळता ‘बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

मागील विश्‍वस्त मंडळाची मुदत संपल्याने धर्मादाय सहआयुक्तांनी नवीन विश्‍वस्तांच्या नेमणुका नुकत्याच जाहीर केल्या. त्यामध्ये जेजुरी शहरातील तीन तर बाहेरील गावांतील चार विश्‍वस्तांचा समावेश आहे. सहधर्मादाय आयुक्तांनी गावाबाहेरील विश्‍वस्त नेमल्याच्या निषेधार्थ जेजुरी बंद ठेवण्याचे आवाहन जेजुरी ग्रामस्थ मंडळाने केले होते. त्याला शंभर टक्के 
प्रतिसाद मिळाला. उपाहारगृहे, भंडार-खोबरे, किराणा मालाची दुकाने व बाजारपेठ बंद असल्याने भाविकांची गैरसोय झाली.

मंगळवारी सकाळी शिवाजी चौकात मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. तेथून खंडोबा गडाच्या पायथ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणा देत निषेधही नोंदविला. ग्रामस्थांनी काळ्या फिती बांधल्या होत्या. मोर्चा गडाच्या पायथ्याशी आल्यावर सर्वांनी कपाळाला भंडार लावून न्यायासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला.

Web Title: jejuri pune news ban for vishwast selection