जेजुरी संस्थानने भरल्या 54 हजारांच्या जुन्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

जेजुरी : चलनातून रद्द केलेल्या हजार व पाशचेच्या जुन्या नोटा भरण्यासाठी देवसंस्थानला 30 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मार्तंड देवसंस्थानने गुरुवारी (ता.29) दानपेट्या व हुंड्या खुल्या करून त्यामध्ये 54 हजार रुपयांच्या जुन्या व अडीच लाखांच्या सध्याच्या चलनातील नोटा मिळाल्या.

नोटाटंचाईचा फटका जेजुरी देवसंस्थानला बसला आहे. देणगीची रक्कम प्रथमच इतकी कमी मिळाली आहे. त्यामुळे देवसंस्थानचे उत्पन्न घटल्याचे मुख्य विश्वस्त संदीप घोणे यांनी सांगितले.

Web Title: jejuri temple deposits 54000