पुणे : कष्टकरी महिलांचे दागिने घेऊन सोनार पसार 

download-(1).jpg
download-(1).jpg

 पुणे (गोखलेनगर) : जनवडी येथील महिलांचे लाखो रुपयांचे दागिने घेऊन सोनाराने पोबारा केला. फसवणूक झालेल्या महिलांनी चतृ:श्रुंगी पोलिस ठाण्यात धाव घेत सोनाराच्या विरोधात तक्रार दिली आहे. परंतु, अजूनही त्या सोनाराचा तपास चतृ:श्रुंगी पोलिसांना लागला नाही. महिलांचे दागिने मिळाले नाहीत. 

गोखलेनगर जनवडी या भागात श्रमिक वर्ग राहतो. महिलांनी कष्टाने  पै-पै जमा करून दागिने घेतले होतो. ज्या वेळी महिलांना पैशाची गरज भासेल तेव्हा या महिला सोनाराकडे दागिने घाण ठेवून पैसे व्याजाने पैसे घेत होत्या. सोनाराकडून महिला दागिणे खरेदी करत असत.  महिला घरच्यांचा परस्पर सोनाराशी आर्थिक व्यवहार करत असत. असा महिलांचा आणि सोनाराचा व्यवहार चालत असे. सोनाराने अचानक "दुकान बंद करायचे आहे, तूमचे सोने परत घेऊन जा. पावत्या व पैसे जमा करा". असे सांगून सर्व महिलांकडून पैसे व पावत्या घेतल्या. दोन दिवसात सोने परत करतो म्हणून नंतर काही दिवस महिलांना चालढकल करू लागला.

"पोलिसांना तक्रार देऊ नका, मी तुमचे दागिने परत करतो"  माझे वडील आजारी आहेत. मी थोड्या दिवसांनी तुमचे दागिने परत करतो. साधारण अनेक महीने महिलांना चाल ढकल करून थांबवले. महिला सैरावैरा झाल्या. घरात कोणालाही महित नसतांना परस्पर व्यवहार केल्याने, बाहेर कोणाला सांगावे हा प्रश्न पडला. धाडस करून नऊ महिलांनी चतृ:श्रुंगी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना तक्रार दिली. तक्रार देवून दीड महिना झाला. तरी आजूनही सोनाराचा तपास चतृ:श्रुंगी पोलिसांना लागला नाही. अशा घटना या परिसरात नवीन नाहीत नेहमी घडत आहेत. कष्टकरी महिलांची फसवणूक होत आहे. पोलीसांनी खाक्या वर्दीची ताकद दाखवणे गरजेचे आहे.
 

''सोनाराने माझे पाच तोळे सोने घेऊन फसवणूक केली आहे. आमचे सोने परत करतो, म्हणून सोनार वारंवार चाल ढकल करत आला पोलिसांकडे तक्रार देऊन महिना झाला तरी देखील आम्हाला आमचे सोने परत मिळाले नाही.''
 - तारा अशोक जाधव, जनवडी गोखलेनगर

''सोनाराने  १ गोलमणी मंगळसूत्र,२ चैन, १ बदाम,अंगठी, कानातले,कानातील रिंग,गळ्यातील १ पदर , चैन असे सोने घेऊन गेला आहे. वडील आजारी आहेत. तुमचे सोने देतो असे सांगत होता. आम्ही त्याला फोन केला तर तो फोनही उचलत नाही.''
 - अंजना सुभाष गायकवाड, जनवडी

''सुनेचे आणि माझे असे दोन्ही मिळून २५ तोळे सोने आहे. उद्या देतो म्हणून गेला तो आजपर्यंत माघारी आलाच नाही. पोलिसांना तक्रार दिली तरी देखील काय त्याचा पत्ता लागला नाही. अशी घटना घडल्यापासून घरातील वातावरण खराब झाले आहे.''
 - साखराबाई बनसोडे, जनवडी

''तपास अधिकारी म्हणून जनवाडी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित जोगदंड यांच्याकडे शनिवारी तपास दिला आहे.''
   - दयानंद ढोमे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com