अवसरीतून 33 तोळ्यांचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

पारगाव - अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील खालचा शिवार वस्तीवर मंगळवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी संभाजी रामदास हिंगे यांच्या घरातील ३३ तोळे वजनाच्या दागिन्यांसह ११ हजार रुपये रोख रक्कम असा साडेसात लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. हिंगे यांची बहीण रूपाली शैलेश काळे यांनी चोरट्यांना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी त्यांचे पाय व डोके दाबून हाताने मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या.

संभाजी हिंगे व त्यांची पत्नी सुनीता व मुलगा हर्षवर्धन टेरेसवर झोपले होते. वडील रामदास हिंगे घराच्या ओट्यावर झोपले, तर रूपाली काळे या घरात झोपल्या होत्या. रात्री दोनच्या सुमारास बहीण रूपाली काळे यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने संभाजी हिंगे उठल्यानंतर सर्व प्रकार समजला. रूपाली काळे प्रतिकार करू लागल्याने घरात घुसलेल्या तीन चोरट्यांनी त्यांचे डोके पलंगाला आपटले व मारहाण केली. संभाजी हिंगे यांनी सामानांची पाहणी केली असता रूपाली काळे यांचे एकूण २२ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, राणी हार, ठुशी, नेकलेस, अंगठी, बांगड्या, कर्णफुले, नथ व साखळी आणि सुनीता हिंगे यांचे आठ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, झुबे, संभाजी हिंगे एकूण तीन तोळे वजनाची सोन्याची अंगठी असा ३३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व कपड्याच्या खिशातील रोख ८५०० रुपये असा एकूण ७ लाख ३२ हजार २०० रुपयांचा माल चोरून नेला तर वस्तीवरीलच दशरथ शंकर हिंगे यांच्या घराची कडी तोडून पेटीतून रोख २२०० रुपये चोरून नेले. 

श्‍वान पथकाकडून दीड किलोमीटरचा माग
माजी सरपंच बी. एन. हिंगे यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे व पोलिस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने पथके रवाना केली आहेत. चोरट्यांची संख्या तीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. श्वान पथकातील दुर्गा श्वानाने घरापासून दीड किलोमीटर अंतरावरील डांबरी रस्त्यापर्यंत माग दाखविला. ठसेतज्ज्ञांनीही घरातील वस्तूवरील नमुने घेतले. 

Web Title: jewellery theft crime