रेल्वेखाली उडी मारून जगताप यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

पुणे - सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप (वय ५३, रा. घोरपडे पेठ) यांनी शनिवारी दुपारी घोरपडी परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली कथित चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, अशी चिठ्ठी मिळाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

व्हायरल झालेल्या चिठ्ठीत माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. मानकर यांच्याशी या संदर्भात संपर्क होऊ शकलेला नाही. 

मानकर यांनी शुक्रवारीच (ता. १) पोलिस उप-आयुक्त (परिमंडल एक) यांच्याकडे केलेल्या तक्रारीत जगताप मला ब्लॅकमेल करीत असून, पैसे उकळण्याच्या उद्देशानेच त्यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. 

जगताप यांच्या मृत्यूची लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. जितेंद्र जगताप हे शहर पोलिस दलातील शैलेश जगताप यांचे भाऊ होत. जितेंद्र यांनी गेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. 

लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज खंडाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप यांनी दुपारी दीडच्या सुमारास मनमाड पॅसेंजरखाली उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी रेल्वेचालकाचा जबाब नोंदवून घेतला आहे. याबाबत तक्रार आल्यास तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे खंडाळे यांनी सांगितले. ही घटना लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, त्यामुळे तेथे गुन्हा दाखल होईल. याप्रकरणी तक्रार आल्यास ती लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात येईल, असे समर्थ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले. 
दरम्यान, रास्ता पेठेतील जागेच्या वादात जगताप यांनी आत्महत्येची धमकी दिल्याची तक्रार मानकर यांनी पोलिसांकडे केली होती. काही घडल्यास मी जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे मानकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. याबाबत अधिक माहितीसाठी मानकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, तो होऊ शकला नाही.

Web Title: jitendra jagtap suicide crime