विनोदाला सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळावी - मंगला गोडबोले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - ""सध्याचे जीवन तणावपूर्ण झाले आहे. त्यातून सावरण्यासाठी विनोदाची अतिरेकी मागणी होताना दिसत आहे. त्यामुळे विनोदाचे गाडे घरंगळत चालले आहे. योग्य ठिकाणी थांबणे हे विनोदाचे मर्म आहे. विनोदाला सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे,'' असे मत लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले. 

लायन्स क्‍लब ऑफ पुणे औंध-पाषाण व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या "विनोद- साहित्य-आनंद मेळा' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस, डॉ. सतीश देसाई, प्रा. मिलिंद जोशी, मकरंद टिल्लू, रवींद्र कोकरे, रमेश शहा, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते. 

फडणीस म्हणाले, ""आजच्या काळातील विनोदाच्या अभिरुचीची कक्षा बदलत चालली आहे. विनोदी लेखन, व्यंग्यचित्रकला क्षेत्रात महिला कमी असून त्यांची संख्या वाढली पाहिजे.'' प्रा. जोशी म्हणाले, ""जनावरे हसू शकत नाहीत, माणसे हसू शकतात. त्यामुळे माणसांनी हसून जीवनाचा रसरशीत आस्वाद घेतला पाहिजे.'' प्रदीप बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: joke should get cultural prestige says Mangala Godbole