प्लास्टिक बंदीची सोशल मिडियावर खिल्ली 

संदीप घिसे
शनिवार, 23 जून 2018

 पिंपरी (पुणे) : राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या बंदीबाबत जनजागृती करणारे आणि खिल्ली उडविणारे मेसेज सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 

 पिंपरी (पुणे) : राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या बंदीबाबत जनजागृती करणारे आणि खिल्ली उडविणारे मेसेज सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 

"महिलांना अगोदर तांदळाच्या डब्यातील पैसे तांदळाच्या डब्यातील पैसे बाहेर काढायला लावले आणि आता गादी खालच्या पिशव्या काढायला सांगत आहेत.' हा मेसेज व्हॉट्‌सऍपच्या बहुतांश ग्रुपवर आला आहे. "घरापुढे गाडी लावू नये अन्यथा गाडीला प्लास्टिक पिशवी अडकवली जाईल.' "बरे झाले फक्‍त प्लास्टीकवर बंदी घातली. जर काचेवर बंदी घातली असती तर दारूच्या दुकानात तांब्या घेऊन जावे लागले असते.' "प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांनाही दंड लागणार का, असा प्रश्‍न काहींनी उपस्थित केला आहे. "अवघ्या महाराष्ट्रासमोर एक गहन प्रश्‍न-उद्यापासून चुना पुडी येणार कशात ? 

"आमच्याकडे प्लास्टिक पिशव्यांना कापडी कव्हर लावून मिळेल - स्थळ अर्थातच पुणे', "जर कोणी तुमच्याकडे पाच हजार रुपये दंड मागितला तर त्याला सांगा, मोदी देणार होते त्या 15 लाखातून वळते करून घे.' काहीजण राजीनामे खिशात ठेवून फिरत होते. पावसाळ्यात प्लास्टिक पिशवीत ठेवत असे. यामुळे फडणवीसांनी प्लास्टिक पिशवीवरच बंद घातली. तुमचा राजीनामा भिजणार - त्यामुळे बसा ठणठण करीत.' तर काहींनी प्लॅस्टिकचे रेनकोट चालेल ना ? नाहीतर महापालिकेवाले न्यायचे उचलून,' अशीही खिल्ली उडविली. 

तर दुसरीकडे राज्यातील ठिकठिकाणी महापालिकेकडून झालेल्या कारवाईच्या पावतीचे फोटो फिरत होते. पहिली विकेट पडली, दुसरीही विकेट पडली, असे सांगत पावतीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

Web Title: jokes on plastic ban viral on social media