चंदू चव्हाण यांचा आदर्श प्रेरणादायी - वळसे पाटील

चंदू चव्हाण यांचा आदर्श प्रेरणादायी - वळसे पाटील

पुणे - भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानमध्ये 3 महिने 21 दिवस अतोनात छळ करण्यात आला. क्षणाक्षणाला मृत्यू सामोर दिसत असतानाही ते भारत माता की जय म्हणून सामोरे जात होते. भारत मातेशी एकनिष्ठ राहून त्यांनी पाकिस्तानला कोणतीही माहिती दिली नाही. जवान चव्हाण यांचा आदर्श युवा पिढीला प्रोत्साहन देणार आहे, असे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले.

चंदू चव्हाण यांच्यावर पाकिस्तानमध्ये अंधाऱया कोठडीमध्ये झालेल्या छळावर आधारीत पत्रकार संतोष धायबर यांनी जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस) हे पुस्तक लिहीले आहे. चव्हाण यांना भारतात येऊन 21 जानेवारी रोजी दोन वर्षे पुर्ण झाली. या मुहुर्तावर वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुळशी पॅटर्न फेम अभिनेते प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, मालविका गायकवाड, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, शिरूरचे माजी आमदार सुर्यकांत पलांडे, रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. अंकुश लवांडे, अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, युवा नेत्या पुर्वा वळसे पाटील उपस्थित होते. 

यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले, 'भारतीय सीमेवर डोळ्यात तेल घालून जवान देशाची सेवा करत असतात. जवानांबद्दल भारतीय नागरिकांच्या मनात आदराची भावना आहे. जवान चंदू चव्हाण भारतात आल्यानंतर 'सकाळ'चे पत्रकार श्री. धायबर यांनी धुळे येथे जाऊन सर्वप्रथम मुलाखत मिळवली होती. 'सकाळ'मध्ये ही माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर देशभर गाजली. प्रेरणादायी अशी सविस्तर माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचेल.'

पुस्तकासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची प्रस्तावना आहे. मराठी व हिंदीमध्ये हे पुस्तक तयार करण्यात आले असून, पुणे येथील ईश्वरी प्रकाशनने पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. शिवाय, www.chanduchavan.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com