गुगल मॅपवरून पृथ्वीची सफर (व्हिडिओ)

गुगल मॅपवरून पृथ्वीची सफर (व्हिडिओ)

पुणे - मोबाईल व लॅपटॉपवर तासन्‌तास खोट्या-खोट्या गोष्टींमध्ये अडकून बसण्यापेक्षा उपग्रहांच्या मदतीने आपल्या खऱ्याखुऱ्या जगाची सफर करण्यातील मजा अनुभवायची आहे का? ही गंमत अमेय गोडे या तरुणामुळे अनेक मुलांना यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कळली आहे. 

अमेयदादा लॅपटॉपवरून पृथ्वीची सफर घडवत होता. त्यानं पुणं दाखवलं. मग शिकागोचं दर्शन घडवलं. जलाशयातलं निळंशार पाणी, हिमालयातील बर्फाळ पर्वतरांगा, दऱ्या, शेतं वगैरे पाहत पाहत शिवनेरी किल्ल्याचं दर्शन त्यानं घडवलं.

अमेय म्हणाला, ‘‘वेगवेगळ्या देशांचे किती तरी उपग्रह पृथ्वीभोवती फिरत आहेत. त्यांच्याकडून विविध प्रकारची माहिती मिळते. गुगल मॅप पाहण्याचं तंत्र शिकून घेतलं, तर बसल्या जागी आपण जग फिरून येऊ शकतो. याच्यामुळे भूगोल हा विषय आपल्यासाठी मजेशीर ठरू शकतो.’’ अमेय नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या विषयातला तज्ज्ञ आहे. काही राज्यांमधील वन खात्याकडून त्याची मदत घेतली जाते. तिथल्या जंगलात लागलेला वणवा कुठून कुठपर्यंत पसरला आहे, वाऱ्याची दिशा बघता वणवा आणखी कुठं पसरू शकतो, कुठल्या झाडांना कीड लागली आहे, कुठलं झाड नंतर तोडलं गेलं वगैरे माहिती अमेय ड्रोनच्या साह्याने मिळवून वन खात्याला मिळवून देतो.

मुलांनी गुगल मॅपच्या आधारे डिजिटल भूगोल शिकावा. मनोरंजन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी त्यातून घडतात. मोबाईल गेमपेक्षा यात केवढी नवलाई आहे, ती अनुभवून तर पाहा. हे शिकणं मजेशीर ठरेल. 
-अमेय गोडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com