दुर्गम भागातून वॉशिंग्टनपर्यंतचा प्रवास विद्यार्थांना मार्गदर्शक ठरावा

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्याची भावना, समाज कल्याणमार्फत ७५ विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड
Abroad Education
Abroad EducationSakal

पुणे : ‘घरची परिस्थिती हलाखीची. खेडेगावात गाई-म्हशींचे पालन-पोषण करून पडेल ते काम केले. पाण्यासाठी दररोज अर्धा किलोमीटर वणवण... अशा खडतर परिस्थितीतही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शिक्षण पूर्ण केले. समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृतीमुळेच खेडेगावापासून वॉशिंग्टनपर्यंतचा माझा प्रवास हा हजारो विद्यार्थांसाठी मार्गदर्शक ठरल्यास जीवनाचे सार्थक होईल,’ अशी भावुक प्रतिक्रिया होती, नाशिक जिल्ह्यातील वाडीव-हे या आदिवासी दुर्गम गावातील चारुदत्त म्हसदे यांची. एम.टेक. झालेल्या चारुदत्तची अमेरिकेच्या न्यूयॉर्क विद्यापीठात संशोधनासाठी निवड झाली आहे. तर, ‘अमरावतीच्या भीमनगर झोपडपट्टीत राहणारा अमरावतीचा विकास तातड म्हणतो, ‘वडिलांना चहा टपरी चालवण्यास मदत करून शिक्षण पूर्ण केले.

Abroad Education
शेतकऱ्यांचं ऐकण्यासाठी व्यवस्था नाही; फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या लंडनच्या केंब्रिज विद्यापीठातील टीचर्स कॉलेजमध्ये संशोधनासाठी निवड झाली, याचा अभिमान वाटतो.’ यांच्यासोबतच छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झालेल्या सर्वसामान्य कुटुंबातील इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी दिली. (Pune News)

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातींमधील ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे २०२१-२२ या वर्षात गेल्या दहा वर्षांतील रेकॉर्डब्रेक कामगिरी झाली आहे. विभागाचे अतिरिक्त मुख्य प्रधान सचिव अरविंद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी ही योजना मार्गी लावली. कागदपत्रे तपासणी व छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त भारत केंद्रे, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड, विद्यानंद चल्लावार, संगीता डावखर, नितीन उबाळे, राधाकिसन देवढे यांच्यासह विभागाच्या शिक्षण शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Abroad Education
अफगाण घडामोडी: पंतप्रधानांची परराष्ट्र मंत्रालयाला महत्त्वाची सूचना

“परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात सुधारणा केल्यामुळे २००३ नंतर प्रथमच योजनेचा कोटा शंभर टक्के पूर्ण झाला. गरजू विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाली याचे समाधान आहे. एकूण लाभार्थी संख्या ७५ वरून दोनशे करण्याचा आमचा मानस आहे.”

- धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

Abroad Education
Dahi handi 2021: सलग दुसऱ्यावर्षी दहीहंडी उत्सवाला परवानगी नाही

जगातील नामवंत विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी कोणतीही अडचण भासू नये. तसेच, त्यांना वेळेत परदेशात जाता यावे आणि त्यांच्या शिक्षणात कोणती बाधा येऊ नये यासाठी सामाजिक न्याय विभागाने यावर्षी गतिमान पद्धतीने शिष्यवृत्ती मंजूर केली आहे.

- डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त- समाज कल्याण विभाग

वडील मजुरी करतात, परदेशात शिक्षणासाठी जाण्याबाबत कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझी लंडन येथील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करण्यासाठी निवड झाली आहे. समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे ते शक्य झाले.

- शिवानी वालेकर, विद्यार्थिनी, भंडारा

Abroad Education
या मुख्यमंत्र्यांमध्ये ती गोष्ट नाही; असे का म्हणाले बावनकुळे?

वर्ष प्राप्त अर्ज (कंसात निवड झालेली संख्या)

२०१७-१८ १७३ (५०)

२०१८-१९ १६० (७५)२०१९-२० १५४ (७५)

२०२०-२१ २१३ (७५)

२०२१-२२ ३०१ (७५)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com