'टिकाऊ आनंदाचा शोध हेच जीवनाचे उद्दिष्ट'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे - टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी अध्यात्माच्या वाटेवर चालायचे असते. परमेश्वरात समर्पित होण्यानेच कायमस्वरूपाचा मोठा आनंद मिळू शकतो, या शब्दांत श्रीगुरू बालाजी तांबे यांनी जीवनाचे उद्दिष्ट काय असावे, हे स्पष्ट केले.

पुणे - टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी अध्यात्माच्या वाटेवर चालायचे असते. परमेश्वरात समर्पित होण्यानेच कायमस्वरूपाचा मोठा आनंद मिळू शकतो, या शब्दांत श्रीगुरू बालाजी तांबे यांनी जीवनाचे उद्दिष्ट काय असावे, हे स्पष्ट केले.

कार्ला येथील आत्मसंतुलन ग्राममध्ये वेदसंतुलन शिबिरात ‘सोमयोग’ या विषयावर श्रीगुरू तांबे मार्गदर्शन करीत होते. ते म्हणाले, ‘‘छोट्या छोट्या ऐहिक आनंदानंतर दुःख येते. असा आनंद कायम राहणारा नसतो. आपले ध्येय टिकाऊ आनंदाच्या प्राप्तीसाठी असले पाहिजे. आनंदाचे डोही आनंद तरंग अशा मनाच्या अवस्थेत केवळ परमेश्‍वरच भेटेल. तशी श्रद्धा हवी. जेथे श्रद्धा असते, तिथे समर्पण, पावित्र्य व शिव असेल. केवळ देवाची प्रतिमा समोर ठेवण्याला, त्याला हार घालण्याला आपण श्रद्धा मानत असू, तर ती मोठी चूक ठरेल. येथे सोमयोग उपयुक्त ठरेल. जगताची स्तुती करण्यासाठी, परमेश्‍वरापर्यंत पोचण्यासाठी ओंकाराचा तरंग उपयोगी पडतो.’’ 

‘‘सर्वांचे संरक्षण करण्याचे काम अग्नी करतो, म्हणून अग्नीची उपासना करणे महत्त्वाचे आहे. शरीरातील अग्नीच्या उपासनेसाठी योग आहे. ‘दिव्या दिव्या दीपत्कार’ असे आपण म्हणतो. दिवा म्हणजे देव असतो. प्रकाशाची प्रार्थना करण्यानेच आपणही उजळून निघतो,’’ असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The joy of life is the goal of sustainable research says balaji tambe