हॅकेथोन स्पर्धेत जेएसपीएम प्रथम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मांजरी - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथोन राष्ट्रीय स्पर्धेत हडपसर येथील जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. बक्षीस स्वरूपात एक लाख रूपयाचा धनादेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी "स्मार्ट डोमेस्टीक गॅस ट्रॉली' हा प्रकल्प स्पर्धेत सादर केला होता. स्पर्धेमध्ये देशभरातून 7 हजार 500 प्रकल्प सहभागी झाले होते.

सावंत महाविद्यालयाच्या वृषाली कोतकर, प्राजक्ता कुंभार, मधुली सुवर्णकर, निवेदिता शेळके, आकाश हाडके, प्रफुल्ल अवघडे यांनी "स्मार्ट डोमेस्टीक गॅस ट्रॉली' हा प्रकल्प सार केला. त्यांनी बनविलेल्या या ट्रॉलीमध्ये गॅस लिकेज, फायर अलार्म, शिल्लक गॅस, किचनचे तापमान, किचन मधील आद्रता एवढेच नाही तर गॅस बुकिंगची सुद्धा ऑटोमॅटिक सोय आहे. परीक्षकांसह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. 

संस्थेचे संस्थापक सचिव व प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, संकुल संचालक डॉ. व्ही. ए. बुगडे, सह संचालक डॉ. संजय सावंत, प्राचार्य डॉ. एम. जी. जाधव यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे. ही स्पर्धा आय. आय. टी., एन. आय. टी सरकारी व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असते.

स्पर्धेच्या अंतीम फेरी सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात 18 ते 22 जून दरम्यानच्या कालावधीत सलग 120 तास घेण्यात आली. यामध्ये जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाने यश संपादन केले. विद्यार्थ्यांना डॉ. डी. एस. वाघोले व विभाग प्रमुख डॉ. एस. बी. चौधरी यांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती संकुल संचालक डॉ. व्ही. ए. बुगडे यांनी दिली. 

Web Title: JSPM First in the Hackathon Championship