पंचेचाळीस आरोपींना न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

आरक्षणासाठी झालेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 45 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोथरूड पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या या आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. पाटील यांनी हा निर्णय दिला. 
 

पुणे - आरक्षणासाठी झालेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 45 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोथरूड पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या या आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. पाटील यांनी हा निर्णय दिला. 

आंदोलन संपल्यानंतर या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली, तसेच तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यात काही पोलिस जखमी झाले, अशी फिर्याद कोथरूड पोलिस ठाण्यात नोंदविल्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली होती. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, ऍड. समीर घाटगे, ऍड. हेमंत झंझाड, ऍड. राकेश ओझा, ऍड. विजय शिंदे, ऍड. नितीन झंझाड, ऍड. अवधूत दुलाणी व ऍड. सचिन गेलडा यांनी आरोपींची बाजू मांडली व मोफत कामकाज केले. 

Web Title: Judicial custody of five forty five accused people