भव्य पालखी मिरवणुकीने रामनवमी साजरी

रमेश मोरे
सोमवार, 26 मार्च 2018

जुनी सांगवी- राम नामाचा जयघोष, मंदीरामधुन दर्शनासाठी लागलेल्या रांगा, पंचक्रोशीतुन यात्रा उत्सवासाठी जमलेली अलोट गर्दी, वेताळ महाराजांचा भव्य पालखी व काठी मिरवणुक सोहळ्याने सांगवी भक्तिमय झाली. गेल्या आठ दिवसांपासुन विविध धार्मिक कार्यक्रमांने श्रीराम जन्मोत्सव व ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सवाची पालखी मिरवणुकीने यात्रा उत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. गेले आठ दिवस सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प.   महाराज यांच्या किर्तनाने सांगता झाली. 

सायंकाळी ७ वा. श्रीराम मंदीर गावठाण, ग्रामदैवत श्री वेताळ महाराज मंदीर येथुन पालखी मिरवणुकीस सुरूवात झाली. उत्सवानिमित्त श्रीराम मंदीर, मारूती मंदीर, ग्रामदैवत वेताळ महाराज मंदीर,गजानन महाराज मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर प्रमुख रस्ते चौकांमधुन स्वागत कमानी सोबत शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. ढोलताशांचा गजर बँड पथक सोबतीला गाण्यांच्या ठेक्यावर नाच करणारा अश्व, पारंपारीक खेळ, तरूणांसाठी कोकणी बँजो..व टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेली पालखी मिरवणुकीने सांगवी भक्तिमय झाली होती. 

सोमवार सकाळी ह.भ.प.स्वप्नराज महाराज मगर (हडपसर) यांचे किर्तन झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गजानन महाराज मंदीर मैदान व प्रमुख रस्त्यावर भरलेल्या या यात्रा उत्सवाचा सांगवीकर व परिसरातील नागरीकांनी आनंद घेतला.  यात्रेत थाटलेली विविध वस्तुंची दुकाने,खाद्यपदार्थांची रेलचेल,बालचमुंसाठी आकाश पाळणा, ड्रँगन ट्रेन, छोट्या झुकझुकगाड्या, या यात्रा उत्सवात बालचमुंसाठी पर्वणी ठरल्या. तर पालखी दर्शनासाठी सांगवीतील रस्ते गर्दीने फुलुन गेले होते. श्रीराम मंदीर गावठान येथुन वेताळ महाराज मंदीर, शितोळे नगर, गजानन महाराज मंदीर मार्गावरून पालखी काढण्यात आली. समस्त सांगवीकरांनी या पालखी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला. सांगवी पोलिसांकडुन यात्रा उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

Web Title: juni sanghvi ram navami utsav