कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: Junior College Professor Agitation on Friday