जॅमर लावलेले चाक बदलणाऱ्या वाहनमालकावर चोरीचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे - रहदारीच्या रस्त्यावर डबल पार्किंग करणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गाडीच्या चाकाला लोखंडी जॅमर लावले. मात्र दंड भरणे दूर, याउलट चालकाने चक्क जॅमर लावलेले चाक बदलून दुसरे चाक बसविले. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहनचालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करत हिसका दाखविला. त्यामुळे वाहनचालकास आपली शक्कल भलतीच महागात पडली. 

या प्रकरणी कमलेशकुमार शुक्‍ला (वय 41, रा. कोरेगाव पार्क) यांना पोलिसांनी अटक केली. डेक्कन वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील भोसले यांनी फिर्याद दिली होती. 

बुधवारी दुपारी पावणेएक ते दीड वाजण्याच्या सुमारास फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील हॉटेल वैशालीसमोर एक वाहन लावलेले होते. त्याच वाहनाच्या शेजारी शुक्‍ला यांनी आपले वाहन लावून "डबल पार्किंग' केले. याबाबतची माहिती डेक्कन वाहतूक विभागास मिळाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने संबंधित वाहनास पिवळ्या रंगाचा लोखंडी जॅमर लावला. 

शुक्‍ला यांनी दंडाची रक्कम भरून जॅमर काढणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात त्यांनी जॅमर लावलेले चाक काढले. त्यानंतर चाकासह जॅमर डिकीत टाकले व दुसरे चाक लावून शुक्‍ला निघण्याच्या तयारी होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी शुक्‍ला यांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध एक हजार रुपये किमतीचा सरकारी लोखंडी जॅमर चोरल्याचा गुन्हा दाखल केला. 

Web Title: Junker Thieves