जुन्नरला प्लॅस्टिक विरोधी कारवाईत 140 किलो प्लॅस्टिक जप्त

junnar
junnar

जुन्नर -  जुन्नर नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिक विरोधात रविवारी (ता.14) आठवडे बाजारात धडक कारवाई केली. या कारवाईत
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या 13 जणांकडून 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला व 140 किलो वजनाचे प्लॅस्टिक जप्त केले.

आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री त त्यांच्या पथकाने ही कारवाई नगर पालिकेच्या तीन व्यापारी संकुलातील दुकाने तसेच किरकोळ भाजी, फळ, किराणा विक्रेते यांच्यावर केली. यावेळी व्यावसायिक विक्रम पुरोहित, मोझम खान, सुनील कर्पे, राजेंद्र लुणावत, सुभाष पन्हाळे, अस्लम हलवाई, महेंद्र कर्पे, जीवन आहुजा यांचेकडून प्रत्येकी दोन हजार व सतीश खंडागळे, अमित पवार, सलमान अन्सारी, अशोक कर्डीले यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्यात आला. हा दंड सदर लोकांनी भरला मात्र प्रदीप जंगम, संकीत पन्हाळे, सरफराज सय्यद, शांताबाई किरपन, राजू कवडे, संजय दळवी, रज्जाक कागदी, अजय गुप्ता, शंकर सलगर, महादेव कोमटे, अस्लम इनामदार, रवींद्र होनकर, सुनीता फावडे, सावित्री कोमटे, बाळू बांगर, योगेश चव्हाण, फकिरा परदेशी, अलका जाधव, रमेश नायकोडी, राजेश माळी, रमजान शेकग, नंदा साबळे, दत्तात्रय कळंबे, खंडू उंडे, अतुल काशीद यांनी बंदी घातलेल्या प्लॅस्टिक पिशव्याचा वापर केला मात्र दंडाची रक्कम न भरल्याने त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. 

प्लॅस्टिक विरोधात अशी कारवाई सातत्याने सुरू राहणार असून दंडाची कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांनी बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com