esakal | जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबजार दोन दिवस बंद; शेतकरी चिंतेत

बोलून बातमी शोधा

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबजार दोन दिवस बंद; शेतकरी चिंतेत

दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनला नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील व्यापारी व नागरिक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबजार दोन दिवस बंद; शेतकरी चिंतेत
sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनला नारायणगाव,वारूळवाडी परिसरातील व्यापारी व नागरिक यांच्याकडुन चांगला प्रतिसाद मिळाला. येथील बाजारपेठेत शुकशुकाट होता.स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, बेल्हे ,जुन्नर येथील उपबजार दोन दिवस बंद ठेवले होते. या मुळे प्रामुख्याने तोड सुरू असलेली टोमॅटो व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू; बेशुध्द पत्नीसाठी 3 तासांनी आली अ‍ॅम्ब्युलन्स

टोमॅटो व भाजीपाल्याला भाव नसल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत बंद मूळे भर पडली आहे.भाव नसल्याने टोमॅटो व भाजीपाला पिकांचे नुकसान टाळण्यासाठी किमान नारायणगाव व ओतूर येथील टोमॅटो व भाजीपाला उपबजार बंद ठेवू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

नारायणगाव, वारूळवाडी परिसरात मागील पंधरा दिवसांत रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. नारायणगाव,वारूळवाडी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने परिसरातील सर्व  व्यापारी व कर्मचारी यांची कोरोना तपासणी केली आहे. नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालय अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे. मात्र या रुग्णालयात सध्या बेड शिल्लक नाही. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने नुकताच आर्वी येथील एका रुग्णाचा नुकताच मृत्यू झाला.

हे वाचा - पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत!

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी नागरिकांनी नियम व अटींचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी केले आहे. दोन दिवसांचा लॉकडाऊन असला तरी लसीच्या उपलब्धतेनुसार तालुक्यातील तीस प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रात, पाच खाजगी दवाखान्यात कोरोना लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे.या सेवेचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कोणतीही सुट्टी न घेता आरोग्य कर्मचारी लसीकरण करून कर्तव्य बजावत आहेत. तालुक्यात ४५ ते ५९ वयोगटातील  २१ हजार २९१ नागरिक,१९ हजार १५६ आरोग्य अधिकारी, कर्मचारी,डॉक्टर, पोलीस, फ्रंट लाइन वर्कर व २० हजार १०२ जेष्ठ नागरिक असे ६९ हजार ५४३ जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

(संपादन : सागर डी. शेलार)