जुन्नरला आदिवासी दिन साध्या पद्धतीने साजरा

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जुन्नर - महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी ता.09 रोजी जुन्नरला जागतिक आदिवासी दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आदिवासी दिनाचे निमित्ताने दरवर्षी काढण्यात येणार रॅली  रद्द करण्यात आली होती.

जुन्नर जवळील बारव येथील आदिवासी सांस्कृतिक भवन  येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. खटकाळे ता.जुन्नर येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी  'तारपा'  आदिवासी नृत्य सादर केले.

आदिवासी क्रांतिकारकांच्या वेशभूषा परिधान केलेले शालेय विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. आदिवासी दिनाच्या औचित्याने रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजयी स्पर्धक तसेच सेट नेट परीक्षा, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. 'भलर' या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. 

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, मारुती वायळ, मधुकर काठे, देवराम मुंढे, दादाभाऊ बगाड, पंडित मेमाणे, गेनू उंडे यांसह आदिवासी बांधव, अधिकारी व कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Junnar celebrates tribal days in a simple way