जुन्नरमधील शेतकऱ्यांचा संपास विरोध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नारायणगाव छ शेतकरी संघटनेच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पुकारलेल्या शेतकरी संपाला जुन्नर तालुक्‍यातील टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे. मागील वर्षी केलेल्या संपामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांचे सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तालुक्‍यातील सुमारे 59 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी टोमॅटो उत्पादकांनी या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. 

शेतकऱ्यांच्या भूमिकेला शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे, विघ्नहर कारखान्याचे माजी संचालक गुलाबराव नेहरकर, अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी पाठिंबा दिला आहे. संप काळात शेतकऱ्यांनी तोडलेल्या मालाच्या वाहतुकीसह विक्रीची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

याबाबत नेहरकर म्हणाले, की मागील वर्षी जून महिन्यात शेतकरी संप पुकारण्यात आला होता. संपकाळात शेतीमालाची वाहतूक बंद राहिल्याचा सर्वांत जास्त फटका जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील टोमॅटो व भाजीपाला, दूध उत्पादकांना बसला. संप काळात भाजीपाला न तोडल्याने शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांचे सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले. सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनाहीन आहे.

संप केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. बाजारभावाअभावी शेतकरी वर्ग गेले वर्षभर अडचणीत सापडला आहे. जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील टोमॅटो व भाजीपाल्याचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. संपामुळे उत्पादकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला आहे.

Web Title: Junnar farmers oppose proposed farmer strike