जुन्नरला युरिया खताचा तुटवडा 

दत्ता म्हसकर
रविवार, 19 ऑगस्ट 2018

जुन्नर : जुन्नरला युरिया खताचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत असून खरेदी विक्री संघासह अनेक कृषी सेवा केंद्रातून युरिया उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन आणि भुईमूग पिकांची खुरपणीची कामे झाली आहेत. या पिकांना नत्र खताची म्हणजे युरियाची आवश्यकता आहे. सध्या युरिया खताची सोयाबीन भुईमूग आणि इतर पिकासाठी मागणी आहे मात्र युरियाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. अशात काही दुकानदाराकडे युरिया आहे पण ते इतर रासायनिक खते घेतल्या शिवाय युरिया देत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जुन्नर तालुका हा शेती प्रधान तालुका असून शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. खरीप हंगामाच्या पूर्व तयारीसाठी होणाऱ्या कृषी विभागाच्या बैठकातून शेतीसाठी लागणारे बी-बियाणे , खते यांचा तुटवडा भासू देणार नाही असे आश्वासन दिले जाते मात्र प्रत्यक्षात ते पाळले जात नसल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. यावर्षी तालुक्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवला. बी उपलब्ध न झाल्याने अन्य पिक घेण्याकडे शेतकऱ्यास वळणे भाग पडले तर आता युरिया चा तुटवडा जाणवत आहे.

खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक  बाबाजी शिरसाठ यांनी सांगितले की, खताची मागणी केली आहे. परंतु महाराष्ट्र बंद नंतर एकही गाडी आली नाही. तालुक्यातील विविध ठिकाणाहून युरिया साठी विचारणा होते परंतु उपलब्ध नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे. युरिया उपलब्ध असणाऱ्या कृषी सेवा केंद्राच्या सक्तीमुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. रासायनिक खतांची गरज नसताना ते खत शेतकऱ्यावर बळेच दिले जात आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 

Web Title: Junnar fertilizer scarcity