जुन्नरला प्रगतशील शेतकऱ्यांचा कृषी विभागाकडून सन्मान

दत्ता म्हसकर
गुरुवार, 3 मे 2018

ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत जुन्नर तालुक्यातील शेतीत उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या वतीने ब रोजी एका समारंभात सन्मान करण्यात आला. 

जुन्नर : ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत जुन्नर तालुक्यातील शेतीत उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या वतीने ब रोजी एका समारंभात सन्मान करण्यात आला. 
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, पुणे व कृषी विभाग, जुन्नरच्या वतीने बुधवारी पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी हा सन्मान करण्यात आला. 

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपसभापती उदय भोपे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष उल्हास नवले, संतोष सहाणे, जमीर कागदी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सेंद्रिय भाजीपाल्याची थेट विक्री करणाऱ्या गोळेगाव येथील पल्लवी गणेश हांडे यांच्यासह बाळासाहेब नाथा काकडे, वैशाली राजेंद्र पवार, विलास प्रकाश डुंबरे, जयवंत रंभाजी जाधव, जयराम अनाजी नवले, बाळासाहेब मुरकुटे, अब्दुल सत्तार इनामदार, विकास चव्हाण, राजाराम चौधरी यांना अनुक्रमे मुक्त गोठा पद्धती, आंबा बाग, देशी गाईचा गोठा, सेंद्रिय शेती, चार सूत्री भात, बटाटा, ज्वारी, फुलशेती यात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल सत्यशील शेरकर व उदय भोपे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
 

Web Title: Junnar honored by the Agriculture Department of the progressive farmers