जुन्नरला विविध प्रभागातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

दत्ता म्हसकर
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जुन्नर- जुन्नर नगर पालिकेच्या विविध प्रभागातील 62 लाख 32 हजार रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

जुन्नर- जुन्नर नगर पालिकेच्या विविध प्रभागातील 62 लाख 32 हजार रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

प्रभाग क्रमांक चार मधील १९ लाख,६१ हजार १६० रुपये खर्चाच्या रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक भाऊ कुंभार, कविता गुंजाळ यांचे उपस्थितीत झाला. कल्याण पेठेतील 38 लाख 4 हजार 690 रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष पांडे,नगरसेवक दीपेश परदेशी, अंकिता गोसावी यांचे उपस्थितीत झाला. आगर पेठ स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे 14 लाख 66 हजार 540 रुपये खर्चाच्या काँक्रीटीकरणाचे कामाचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, नगरसेवक अक्षय मांडवे, समिर भगत, सुवर्णा बनकर, सना मंसुरी, हाजरा इनामदार माजी नगरसेवक कुलदिप खोपे, अविनाश कर्डिले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा आरती ढोबळे, रोहिणी पवार, स्वाती हांडे, जयश्री भिसे, स्थानीक नागरिक, शहर अभियंता विवेक देशमुख व ठेकेदार दिपक शेवाले उपस्थित होते. 

Web Title: Junnar launches work on various roads