वनखात्याच्या कारवाईच्या निषेधार्थ जुन्नरला मोर्चा

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 29 जून 2018

आदिवासी समाज अनेक वर्षांपासून ज्या जमीनीवर राहत आहे, शेती करत आहे अशा सरकारी जमिनी या त्यांच्या न्याय हक्काच्या आहेत, असा दावा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष सुरेश माने यांनी यावेळी केला.  

जुन्नर - वनखात्याने जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी व नारायणगड परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजावर अतिक्रमण कारवाई करून अन्याय केल्याचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवार ता. 29 ला जुन्नर तहसील व वनखात्याच्या कार्यालयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.  

आदिवासी समाज अनेक वर्षांपासून ज्या जमीनीवर राहत आहे, शेती करत आहे अशा सरकारी जमिनी या त्यांच्या न्याय हक्काच्या आहेत, असा दावा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष सुरेश माने यांनी यावेळी केला.    

आदिवासी समाज कसत असलेल्या जमिनी सरकारी आहेत असे सांगत वनविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईचा यावेळी सामूहिक निषेध करण्यात आला. 

पक्षाचे अध्यक्ष सुरेश माने व उपाध्यक्ष प्रकाश आहेर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात  आले. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Junnar Morcha protested against forest action proceedings