जुन्नर : विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका

दत्ता म्हसकर
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार भक्ष्याच्या शोधात असणारा हा कोल्हा रविवारी दुपारी विहिरीत पडला होता. वनपाल कृष्णा दिघे यांनी बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांना फोनवरून कळविले नंतर डॉ. देशमुख व त्यांची टीम घटनास्थळी पोहचली दोरीच्या सहाय्याने रिकामे क्यारेट विहिरीत सोडण्यात आले.

जुन्नर : माणिकडोह (ता.जुन्नर) येथील बिबट निवारा केंद्र व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वडज येथील अनिल साळुंखे यांच्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची दोन तासांच्या प्रयत्नाने सुटका केली.

बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार भक्ष्याच्या शोधात असणारा हा कोल्हा रविवारी दुपारी विहिरीत पडला होता. वनपाल कृष्णा दिघे यांनी बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांना फोनवरून कळविले नंतर डॉ. देशमुख व त्यांची टीम घटनास्थळी पोहचली दोरीच्या सहाय्याने रिकामे क्यारेट विहिरीत सोडण्यात आले.

कोल्ह्याने त्यात बसावे यासाठी खंडू कोकणे विहिरीत अर्ध्यावर उतरले होते. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांना यश आले. कोल्हा कॅरेटमध्ये बसला. त्याला वर घेऊन सोडून देण्यात आले.

Web Title: Junnar news fox down in well