जुन्नरजवळील नाणेघाटात पोलिस बंदोबस्ताची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

जुन्नरच्या पश्‍चिमेस 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक नाणेघाटात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटनास आलेल्यांपैकी काही जण या परिसरात मद्यपानही करतात. त्यामुळे महिला पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

जुन्नर : जुन्नरच्या पश्‍चिमेस 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक नाणेघाटात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटनास आलेल्यांपैकी काही जण या परिसरात मद्यपानही करतात. त्यामुळे महिला पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या पार्श्‍वभूमीवर या परिसरात पोलिस बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

स्थानिक ग्रामस्थ तसेच पर्यटनास आलेल्या महिलांना आषाढाची पार्टी करणाऱ्यांच्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच पावसाळ्यामध्ये येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. गर्दीवर नियंत्रण व वचक ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त आवश्‍यक असल्याची मागणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात येथे शनिवार, रविवारी व इतर सुट्यांच्या दिवशी मोठी गर्दी आसते. यात काही मद्यपान व मांसाहारी जेवणासाठी येतात. मद्यपींचा अन्य पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांना त्रास होतो. मारामारीाच्या घटनाही घडतात. पर्यटकांनी आणलेल्या मद्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, जेवणाची थर्माकोलची ताटे व प्लॅस्टिक परिसरात टाकून दिले जाते. यामुळे पर्यावरणास हानी पोहचत आहे. या सर्व बाबीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी या भागाचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी केली आहे.

Web Title: junnar news pune news marathi news naneghat police security needed