जुन्नर: बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

पराग जगताप
शनिवार, 15 जुलै 2017

नेतवड येथील कुटे मळ्यात घडली असून या हल्ल्यात नंदा कुंडलिक वाघमारे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या बाबात ओतूर प्रथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. श्रीहरी सारोक्ते म्हणाले, कि नंदा कुडलिक वाघमारे यांच्यावर त्यांच्या घराजवळच काही अंतरावर बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले.

जुन्नर : नेतवड येथील कुटे मळ्यात घराजवळ काही अंतरावर हल्ला करुन बिबट्याने एका महिलेला गंभीर जखमी केले. ही घटना आज (शनिवार) सकाळी सहाच्या दरम्यान घडली.

नेतवड येथील कुटे मळ्यात घडली असून या हल्ल्यात नंदा कुंडलिक वाघमारे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या बाबात ओतूर प्रथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. श्रीहरी सारोक्ते म्हणाले, कि नंदा कुडलिक वाघमारे यांच्यावर त्यांच्या घराजवळच काही अंतरावर बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्यांना जखमी स्थितीत ओतूर प्रथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. त्यांच्यावर प्रथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी पुणे येथील शासकिय रुग्णालय वाय. सी. एम येथे पाठवण्यात आले आहे.

नारायणगाव वनपरिमंडलच्या वनपाल मनिषा काळे यांच्याशी संपर्क साधला असता वनविभागाकडून जखमी महिलेच्या नातेवाईकाशी संपर्क झाला असून पुणे येथे स्वतः वनकर्मचारी जाऊन त्यांच्या भेट घेण्यासाठी निघाले आहे. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च वनविभागाकडून देण्यात येणार असून सायंकाळपर्यंत नेतवड व परिसरात पहाणी करुन बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे. तसेच रात्री गस्तही घालण्यात येणार आहे अशी माहीती देण्यात आली.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: junnar news women injured on leopard attack