जुन्नर पोलिसांनी केला नवनिर्वाचित पोलिस पाटलांचा सत्कार

दत्ता म्हसकर
बुधवार, 2 मे 2018

जुन्नर पोलिसांच्या वतीने सर्व नवनिर्वाचित पोलिस पाटलांचा आज (बुधवार) सत्कार करण्यात आला. यावेळी नवीन नियुक्त झालेले 36 पोलिस पाटील व जुने 12 असे 51 जणांनी उपस्थिती लावली.                 

जुन्नर : जुन्नर पोलिसांच्या वतीने सर्व नवनिर्वाचित पोलिस पाटलांचा आज (बुधवार) सत्कार करण्यात आला. यावेळी नवीन नियुक्त झालेले 36 पोलिस पाटील व जुने 12 असे 51 जणांनी उपस्थिती लावली. यामध्ये 9 महिला पोलिस पाटलांचा समावेश होता.                    

पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांनी त्यांना पोलिस पाटलांचे हक्क व कर्तव्य याची माहिती दिली. तसेच त्यांचा सत्कार केला. उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी पोलिस पाटलांच्या कामकाजाच्या पद्धतीची माहिती दिली. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी घ्यावी. गुन्हेगारी बाबत काळजी घेऊन वेळोवेळी पोलिसांना माहिती देण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोलिस उपनिरीक्षक शीतल चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Junnar police felicitates newly elected police patrols