लेण्याद्री: बालके,वीटभट्टी व ऊसतोड मजुरांच्या बालकांना पोलिओ डोस

दत्ता म्हसकर
रविवार, 11 मार्च 2018

विटभट्टया तसेच ऊसतोड मजूर यांच्या वस्तीवर जाऊन तेथील बालकांना पोलीओ डोस पाजण्यात आले. रविवारच्या सुट्टीत लेण्याद्री देवस्थानाला भेट देणाऱ्या बालकांना पोलीओ डोस पाजण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. पुढील ३ दिवसात घरोघर भेट देऊन आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती यांच्या मार्फत ११ मार्चला चुकून राहीलेल्या बालकांना शोधून त्यांनाही पोलीओ डोस पाजण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.बी. भोर यांनी दिली

जुन्नर - सावरगाव ता.जुन्नर येथीलप्राथमिक आरोग्य केंद्रात प्लस पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभापती ललिता चव्हाण , जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, गुलाब पारखे आदी मान्यवर उपस्थित होते. सावरगांव येथे  पाच वर्षाखालील बालकांना पोलीओ डोस देण्यासाठी  चोवीस लसीकरण केंद्र तयार करण्यात आली होती.

विटभट्टया तसेच ऊसतोड मजूर यांच्या वस्तीवर जाऊन तेथील बालकांना पोलीओ डोस पाजण्यात आले. रविवारच्या सुट्टीत लेण्याद्री देवस्थानाला भेट देणाऱ्या बालकांना पोलीओ डोस पाजण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. पुढील ३ दिवसात घरोघर भेट देऊन आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती यांच्या मार्फत ११ मार्चला चुकून राहीलेल्या बालकांना शोधून त्यांनाही पोलीओ डोस पाजण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.बी. भोर यांनी दिली. पुणे जिल्हा परीषद सदस्य आशा बुचके यांनी आरोग्य केंद्रात नुकत्याच जन्मलेल्या  बालकाला पोलीओचे डोस पाजून उद्घाटन केले. या प्रसंगी जिल्हा परीषद सदस्य गुलाब पारखे, पंचायत समिती सभापती ललीताताई चव्हाण, उदय ढमढेरे या प्रसंगी उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी जिल्हा स्तरावर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी  तालुकास्तरावर या मोहीमेस मार्गदर्शन केले

Web Title: junnar pune news health