खैरे-खटकाळे रस्त्यावर दरड कोसळल्याने बंद झालेली वाहतूक पूर्ववत 

दत्ता म्हसकर
बुधवार, 18 जुलै 2018

जुन्नर : वैशाखरे-नाणेघाटमार्गे जुन्नर या जिल्हा प्रमुख जिल्हा मार्गावर खैरे-खटकाळे येथे सोमवारी (ता.16) रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. डोंगरावरील दगड,माती,झाडे-झुडपे रस्त्यावर आल्याने वाहतुक बंद झाली होती.  

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता युवराज मळेकर व कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने  दरड व माती तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.  

शनिवार ते सोमवारपर्यंत जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आदिवासी भागातील खैरे-खटकाळे गावांच्या हद्दीत असणाऱ्या डोंगरावरील दरड कोसळण्याची घटना घडली.

पाऊस अधिक असल्यास या मार्गावरील पुलांवरून पाणी वाहते. अशावेळी एस टी बस सुविधा बंद करण्यात येते. या घटनेमुळे खाजगी वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे नागरिकांना जुन्नर व अन्य गावांकडे जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होता. या घटनेची तातडीने दखल घेत बांधकाम विभागाने रस्ता वाहतुकीस खुला केल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Junnar road which was closed due to landslide, reopened now