जुन्नरला जलजागृती सप्ताहाचा जलपूजनाने शुभारंभ

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील प्रमुख नद्या व धरणांतील पाण्याचे जलपूजन करून जलसंपदा विभागाच्या वतीने जलजागृती सप्ताहाचा आज शुक्रवार (ता. 16) पासून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कार्यकारी अभियंता नान्नोर, तहसीलदार किरण काकडे, उप कार्यकारी अभियंता डावरे, सहाय्यक अभियंता बागुल, शाखा अभियंता देविदास भालेराव, प्रकाश मांडे व कर्मचारी उपस्थित होते. या सप्ताहाचा येत्या 22 तारखेला समारोप होणार आहे. सप्ताहाच्या काळात विविध स्पर्धा तसेच शाखा कार्यालयात जलजागृती विषयक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. 

Web Title: Junnar starts Jal Jugruti Week and jalpujan