जुन्नर तालुका शिक्षक-पालक संघाचे कार्य कौतुकास्पद 

दत्ता म्हसकर
मंगळवार, 10 जुलै 2018

जुन्नर - 'ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा देण्याचे जुंन्नर तालुका शिक्षक-पालक संघाचे काम खरोखर कौतुकास्पद आहे' असे प्रतिपादन जयहिंद शैक्षणिक संकुलाचे संस्थापक तात्यासाहेब गुंजाळ यांनी केले.

तहसीलदार किरण काकडे म्हणाले , जुन्नरचा दहावीचा  निकाल उल्लेखनीय आहे. कष्ट, जिद्द, व सराव या त्रिसूत्रीचा जीवनात उपयोग करा यश निश्चित मिळेल. 

यावेळी तालुक्यातील प्रत्येक शाळेतील दहावीतील प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यास स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या वतीने रोख ५००/- रुपये देऊन गौरविण्यात आले. शंभर टक्के निकाल असणाऱ्या विद्यालयाच्या मुख्यध्यापकांचा देखील सन्मान करण्यात आला. गुरुवर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार,सेवाभावी संस्था कृतज्ञता सन्मान देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष भरत चिलप, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस्. गल्हे, जयहिंद इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.प्रा. गटकळ, पॉलिटेकनिक चे प्राचार्य योगेश गुंजाळ, शिक्षक - पालक संघाचे अध्यक्ष रामभाऊ सातपुते, सचिव फकीर आतार, जुन्नर शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष भास्कर पानसरे, ब्रिलियन्स एज्युकेशनल फौंडेशनचे संस्थापक इस्माईल खान, मुख्याध्यापक हरिश्चंद्र नरसुडे, मुख्याध्यापक प्रतिनिधी एस्. एन. जाधव आदी मान्यवर शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत प्रा.सुभाष आंद्रे यांनी केले सूत्रसंचालन प्रा.हेमंत महाजन यांनी केले.

Web Title: Junnar taluka teacher-parent team's work appreciated