तुळजाभवानी मातेची पलंगावर स्थापना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

जुन्नर - येथील तिळवण तेली समाज कार्यालयात परंपरेने दहा दिवसांच्या वास्तव्यासाठी आलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगावर मंगळवारी (ता. १८) मातेची विधिवत स्थापना करण्यात आली.

शेकडो भक्तांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १५) घोडेगाव येथून मातेच्या पलंगाचे जुन्नरला आगमन झाले. पालखीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी स्थापना झाली. दहा दिवसांच्या वास्तव्यात येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दररोज पहाटे दुर्गा सप्तशतीपाठ, दुपारी विविध गावच्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी प्रवचन, आरती व कीर्तन असे कार्यक्रम असून, सोमवारी (ता. २४) सकाळी होमहवन, सायंकाळी कीर्तन व नंतर महाप्रसाद होणार आहे. मंगळवारी (ता. २५) पलंगाचे तुळजापूरकडे प्रस्थान होईल.

Web Title: junnar Tuljabhavani mata