जुन्नरचा पाणीप्रश्न बिकट

दत्ता म्हसकर
बुधवार, 27 जून 2018

जुन्नर - जुन्नर शहराचा पाणीप्रश्न बिकट झाला असून नागरिकांना पिण्यासाठी तसेच दैनंदिन वापराचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

गेले पाच-सहा दिवसापासून नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून, अत्यंत कमी दाबाने अत्यल्प वेळ पाणी उपलब्ध होत आहे. तसेच मिळणारे पाणी माती मिश्रित गढूळ व पिवळसर रंगाचे असल्याने पिण्यासाठी अयोग्य असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अस्वच्छ व अशुद्ध पाणी पिण्यात आल्याने आजारांना सामोरे जाण्यापेक्षा विकतचे जार,बाटली मधील पाणी घेण्याकडे कल वाढल्याने पाणी विक्रीचा व्यवसाय शहरात जोरात सुरू आहे.

पाणी प्रश्नाची तीव्रता लक्षात घेत पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस व आपला माणूस आपली आघाडीचे गटनेते दिनेश दुबे व जमीर कागदी यांनी मंगळवारी ता.२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा व्हावी अशी मागणी केली ती अध्यक्षांनी फेटाळून लावली यामुळे सभात्याग केला होता. 

दरम्यान नगराध्यक्ष शाम पांडे यांनी हा प्रश्न चर्चेने सोडविता येणार असल्याने सभा रद्द करण्याची मागणी गैरवाजवी असल्याचे सांगून सभेचे कामकाज पूर्ण केले. पाणी प्रश्नाबाबत ते म्हणाले, विद्युत पुरवठ्याच्या अनियमितपणा व कमी-अधिक दाबामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी जळून नादुरुस्त झाल्या तसेच बंधाऱ्यात पाणी साठा कमी झाल्याने जॅकवेल मधील जलवाहिनीत गाळ जमा झाला होता. त्याची स्वच्छता करणे व मोटार दुरुस्ती या तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मात्र आता ही कामे पूर्ण झाली असल्याने गुरुवारी ता.28 पासून नियमितपणे पाणी पुरवठा करण्यात येईल.

Web Title: Junnar water question is complicated