श्री काळभैरवनाथ मंदिराला चढला फुलांचा साज

पराग जगताप
रविवार, 8 एप्रिल 2018

कालाष्टमी निमीत्त श्री काळभैरवनाथ व श्री मुक्तादेवी यात्रेसाठी दादर फुलमार्केट मुंबई व श्री संत सावतामाळी मंडळ, मुंबई (उदापूर) यांनी अंदाजे तीन लाखा पेक्षा जास्त रुपये खर्च करुन श्री काळभैरवनाथ मंदिर व श्री मुक्तादेवी मंदिरीत आकर्षक फुलाची सजावट केली आहे.

ओतूर ता. जुन्नर - काळभैरवनाथ यात्रेनिमीत्त उदापूरला मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे. उदापूर ता. जुन्नर येथे आज रविवार ता. 8 एप्रिल ला कालाष्टमी निमीत्त श्री काळभैरवनाथ व श्री मुक्तादेवी यात्रेसाठी दादर फुलमार्केट मुंबई व श्री संत सावतामाळी मंडळ, मुंबई (उदापूर) यांनी अंदाजे तीन लाखा पेक्षा जास्त रुपये खर्च करुन श्री काळभैरवनाथ मंदिर व श्री मुक्तादेवी मंदिरीत आकर्षक फुलाची सजावट केली आहे.

Temple

मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यासाठी श्री संत सावतामाळी मंडळ मुंबईचे अध्यक्ष विष्णू शिंदे, दिपक भास्कर, निवृती शिंदे, सुभाष शिंदे, रमेश शिंदे, संजय अमुप, मनोहर शिंदे, चंद्रकांत अमुप, संतोष शिंदे (वाडेकर) यांनी व दादर फुलमार्केट मुंबईच्या सभासदांनी व उदापूर ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Temple
  
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Junnars Kalbhairav Temple Decorated by Flowers

टॅग्स