जुन्नरच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार के. डी. भुजबळांकडे राहणार

दत्ता म्हसकर
रविवार, 1 जुलै 2018

जुन्नरला स्वतंत्र गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती न झाल्याने हा पदभार त्यांचेकडे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भुजबळांनी आपल्या कार्यकाळात तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्ता व प्रगती उंचावण्याचे महत्वाचे काम केले.

जुन्नर - जुन्नर तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी के.डी.भुजबळ सोमवारी ता.2 रोजी पुणे जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी (शिक्षण) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. त्याचबरोबर जुन्नरचा गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार त्यांचेकडे राहणार आहे. 

जुन्नरला स्वतंत्र गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती न झाल्याने हा पदभार त्यांचेकडे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भुजबळांनी आपल्या कार्यकाळात तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्ता व प्रगती उंचावण्याचे महत्वाचे काम केले. गुणवत्तेत जुन्नर राज्यात आणि जिल्ह्यात अग्रेसर आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. इंग्रजी माध्यमाकडे जाणारी मुले जिल्हा परिषद शाळेकडे आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना यशस्वी झाल्याने तालुक्यातील एकही शिक्षक अतिरिक्त ठरला नाही.  शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल चांगले राहिले. एक शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ते तालुक्यात केवळ शिक्षकांत नव्हे तर सर्व सामन्यात परिचित झाले होते. कनिष्ठ महाविद्यालयात सुरू असलेले खासगी शिकवणी वर्ग, आरटीआय प्रवेश व शुल्क तसेच खासगी अनुदानित शाळांतून घेण्यात येणारी फी आदी बाबत पालकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत कारवाईचा बडगा उचलला होता. यामुळे संस्था चालकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते त्यांच्या बदलीची मागणी होऊ लागली होती. मात्र ही बदली त्यांच्या विनंतीवरून झाली आहे. जुन्नरचा पदभार त्याच्याकडे असल्याने त्यांनी केलेल्या विविध कारवाई बाबतचे काम पुढे सुरू राहणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Junnars post of Education Officer Will stay at K D Bhujbal