जुन्नर "राष्ट्रवादी'डे

रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. जुन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आला असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यानुसार 3 ऑक्‍टोबर रोजी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

 

अतुल बेनके तीन ऑक्‍टोबरला अर्ज भरणार

 

नारायणगाव (पुणे) : ""विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. जुन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आला असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यानुसार 3 ऑक्‍टोबर रोजी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे,'' अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली.

पिंपळगाव जोगे उपविभाग कार्यालय हस्तांतराविरोधात बेनके यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आंदोलन केले होते. बेनके हे 14 दिवसांच्या आंदोलनानंतर आज सकाळी नारायणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बेनके म्हणाले, ""मी धरणग्रस्त असल्याने शेतकरी प्रश्‍नांची मला जाण आहे. यामुळे हक्काच्या पाण्यासाठी मी आंदोलन केले. जुन्नर तालुक्‍यातील शेतकरी, विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे सरकारला झुकावे लागले. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्‍याच्या हितासाठी दुसरी लढाई लढण्यास मी सक्षम आहे. माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार मी 3 ऑक्‍टोबर रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, मार्गदर्शक संजय काळे, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. नियोजनासाठी बुधवारी (ता. 25) जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नारायणगाव येथे बैठक होणार आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junner assembly seat goes to Ncp