वाळूमाफियांनो याद राखा - श्रीकांत पाटील

राजकुमार थोरात
गुरुवार, 29 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येथील पाण्यासाठी सुरु असलेले नदीकाठच्या शेतकऱ्यांचे उपोषण तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ज्युस घेऊन सोडण्यात आले. उपोषण सोडण्यापूर्वी शेतकऱ्यांना पाटील यांनी मार्गदर्शन करीत असताना नदीचे विद्रूप रुप पाहुन वाळूमाफियांचे नाव न घेता पुन्हा चूक कराल तर याद राखा...अशा शब्दामध्ये सज्जड दम दिला असून भविष्यात वाळूमाफियांच्या विरोधात धडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.  

वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येथील पाण्यासाठी सुरु असलेले नदीकाठच्या शेतकऱ्यांचे उपोषण तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ज्युस घेऊन सोडण्यात आले. उपोषण सोडण्यापूर्वी शेतकऱ्यांना पाटील यांनी मार्गदर्शन करीत असताना नदीचे विद्रूप रुप पाहुन वाळूमाफियांचे नाव न घेता पुन्हा चूक कराल तर याद राखा...अशा शब्दामध्ये सज्जड दम दिला असून भविष्यात वाळूमाफियांच्या विरोधात धडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.  

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा नदीच्या पात्रामध्ये वाळूमाफियांनी बेसुमार वाळूचा उपसा करुन नदीच्या पात्राची अक्षरश: वाट लावली आहेत. नदीच्या पात्रामध्ये सध्या आठ ते दहा फुट उंचीचे वाळूच्या चाळाचे ढीगच्या ढीग दिसत असून तेवढेच मोठे खड्डे पडले आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी निरवांगी (ता.इंदापूर) येेेेथे आठ दिवस कोरड्या नदीपात्रामध्ये उपोषण केले. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी येणारा प्रत्येक व्यक्ती वाळूमाफियांनी नदीच्या पात्रामध्ये केलेले खड्डे व ढिगाऱ्यांचा प्रताप पाहुन आश्‍चर्यचकित होत होता. व नदीचे झालेले विद्रूप रुप पाहून क्षणभर थांबत ही होता.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी  अनेक राजकीय,सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी भेटी दिल्या.अनेक नागरिकांनी पाण्यासाठी सुरु केलेले आंदोलनाचे कौतुक करुन वाळूउपसा कायमस्वरुपी बंद करण्यासाठी आंदोलन करण्याचा सल्ला देत होते.  शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍न सुटावा यासाठी तहसीलदार श्रीकांत पाटील ही गेल्या आठ दिवसापासुन तळ ठोकून नदीमध्ये बसले होते.

उपोषणच्या ठिकाणच्या नदीपात्रातील वाळूमाफियांनी केलेले  मोठे-माेठे खड्डे पाहुन तहसीलदार पाटील हे अाठ दिवस अस्वस्थ असल्यासारखे दिसत होते. पाटील यांच्या हस्ते ज्यूस घेवून उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सोडले. उपोषणसोडण्यापूर्वी पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यामध्ये पाटील यांनी सांगितले की, या उपोषणामुळे भविष्यात अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होतील.पाण्याच्या प्रश्‍नासाठी नदीकाठचे शेतकरी एकत्र आले असून त्यांची मोठी ताकद तयार झाली आहे. प्रत्येक गावातील दोन चेहरे माझ्या चांगल्या ओळखीचे झाले असून अनेक कामे करावयाची आहेत. त्यांनी वाळूमाफियांचे नाव न घेता पुन्हा चूक कराल तर याद राखा...असा अप्रत्यक्ष सज्जड दम देवून येणाऱ्या काही दिवसामध्ये वाळूमाफियांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्याचा इशारा दिला आहे. 

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अॅड.राजेंद्र काळे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची निरवांगी मध्ये भेट घेतली. नीरा नदीचे विद्रूप रुप पाहुन त्यांनी सडेतोड भाषण करुन बेकायदेशीर वाळू उपसा बंद करण्यासाठी ही आंदोलन करण्याची विनंती केली होती.
 

Web Title: just rember sand mafia - shrikant patil