महंमदवाडीतील पालखी व डीपी रस्त्याला दै. सकाळमुळे न्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 डीपी रस्त्याला दै. सकाळमुळे न्याय

महंमदवाडीतील पालखी व डीपी रस्त्याला दै. सकाळमुळे न्याय

उंड्री : मंहमदवाडीतील ब्रिटीशकालीन पालखी मार्ग आणि डीपी रस्त्याचे काम स्थानिक आमदार आणि शेतकऱ्यांच्या शिष्टाईमुळे सुकर झाले. आमदार चेतन तुपे यांच्यासमवेत ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली. महंमदवाडीतील १२,१३,३०,३२,३३,५७,५८ या सर्वे क्रमांकामधून १८ मीटर डीपी रोड १९९७ साली मंजूर झाला आहे. दै. सकाळमुळे महमंदवाडीतील पालखी मार्गाला २३ वर्षांनंतर डीपी रस्त्याला न्याय मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी सुरेश घुले, मनोज घुले, महेश घुले, कलेश्वर घुले, योगेश घुले, नामदेव घुले, प्रदीप घुले, सुदाम घुले, लक्ष्मण घुले, बाळासाहेब घुले, गुलाब घुले, रामदास घुले, दत्तात्रय घुले, गणेश घुले, तानाजी घुले, कैलास घुले, शाश्वत घुले, अजय घुले, सुदाम घुले, हनुमंत घुले, नीलेश घुले, अंकुश घुले आदी शेतकरी उपस्थित होते.

दै. सकाळमध्ये ब्रिटीशकालीन पालखी मार्गाचे काम रखडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने समिती बनवून आमदारांच्या मार्फत भेट घेतली. यावेळी ब्रिटीशकालीन पालखी मार्ग १८ मीटर रुंदीचा झाला पाहिजे, यासाठी रस्त्याची मोजणी करावी, तसेच महंमदवाडी गावातील रस्ते अरुंद असून, रस्ता रुंदीकरणासाठी अनेक अडचणी येतील, त्यामुळे गावाबाहून डीपी रस्ता करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली. यावेळी उंड्री-महंमदवाडीतील नागरिकांना हडपसरहून पुण्याकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. ब्रिटीशकालीन रस्ता १८ मीटर करताना एफएसआय, टीडीआर, क्रेडिट नोट यापैकी कोणताही मोबदला द्यावा, अशी मागणी केली.

आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, नागरिकांना वारंवार नोटीसा देऊन जमीनमालक तयार होत नाहीत. मात्र, महंमदवाडीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून रस्त्यासाठी जमीन देण्याचा मोठेपणा दाखवला, त्याबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. मालमत्ता विभाग आणि झोनल विभागाला तातडीने रस्त्याचे काम मार्गी लावण्यास सांगितले, तसेच रस्त्याच्या कामासाठी सहा कोटी रुपयांचे बजेट टाकण्याचे लेखी आश्वासन दिले. या रस्त्याचे काम गुरुवारी (दि. १ सप्टेंबर, २०२२) सकाळी करण्यात येईल, असे जाहीर कऱण्यात आले. तसेच जुन्या पालखी मार्गाचे काम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Justice Due Mahamadwadi Dp Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..