ज्योती कुमारी खूनप्रकरणी दोघांना 24 जूनला फाशी 

ज्योती कुमारी खूनप्रकरणी दोघांना 24 जूनला फाशी 

पुणे - बीपीओ कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या पुरुषोत्तम बोराटे (वय 36), प्रदीप काकडे (वय 31) यांना 24 जून रोजी फाशी देण्यात येणार आहे. याबाबत पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी 10 एप्रिल रोजी वॉरंट जारी केले आहे. 

सध्या दोघे आरोपी येरवडा कारागृहात आहेत. ज्योती कुमारी मूळची गोरखपूर येथील होती. नोकरीच्या अखेरच्या दिवशी बोराडे आणि काकडे तिला घरापासून कार्यालयात सोडण्यासाठी कंपनीच्या गाडीमधून घेऊन गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी ती घरी न आल्याने तिच्या नातेवाइकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, 2 नोव्हेंबर 2007 रोजी गहुंजे येथे तिचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी बोराटे आणि काकडे यांना अटक करण्यात आली होती. मार्च 2018 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. 

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या दोघांचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर राष्ट्रपतींनी दोन वर्षांपूर्वी या दोघांचा दयेचा अर्ज फेटाळला. दरम्यान, पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी दोघांना फाशी देण्याबाबत वॉरंट जारी केले असून, याबाबत येरवडा मुख्य अधिकाऱ्यांना फाशीची अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार दोन्ही आरोपींना 24 जून रोजी फाशी देण्यात येणार आहे. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com