कडूस परिसराची पाण्याची चिंता दूर, कुमंडला नदीवरील बंधारा तुडूंब

Kumandal-River-Dam
Kumandal-River-Dam

कडूस - समाधानकारक पावसामुळे कडूस (ता. खेड) येथील कुमंडला नदीवरील बंधारा पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला असून बंधाऱ्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे कडूस परिसराची पाण्याची चिंता दूर झाली आहे.

दोन दिवसांपासून कडूस परिसरात समाधानकारक पाऊस सुरू आहे. या पावसामुळे परिसरातील ओढे-नाले पुराच्या पाण्याने वाहू लागले आहे. कोहींडे, तळवडे, शेंडेवाडी त्याचबरोबर कुंडेश्वर डोंगराच्या कुशीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे कुमंडला नदी प्रवाही झाली आहे. यामुळे कडूस येथील कुमंडला नदीवरील 2.25 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा बंधारा पाण्याने तुडूंब भरला आहे. बंधा-याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे कडूस, शेंडेवाडी, पानमंदवाडी, मुसळेवाडी, तुरुकवाडी, गारगोटवाडी परिसराची पाणी टंचाई दूर झाली आहे. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बाराही महिने  बंधा-यातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. परिसरातील पाण्याचा एकमेव आधार असलेला बंधारा तुडूंब भरल्याने शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com