भटक्‍या विमुक्तांचा ‘आक्रोश’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे - ‘‘नारायणगाव व दौंड येथील कैकाडी व भटक्‍या विमुक्तांना न्याय मिळावा, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करावी,’’ असे मत अखिल भारतीय विमुक्त भटके आदिवासी महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष व साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केले. 

नारायणगाव येथील मानव कुटुंबावरील अत्याचार व दौंड येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ अखिल भारतीय कैकाडी महासंघ, अखिल भारतीय विमुक्त भटके आदिवासी महासंघ, विविध पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी ते बोलत होते. लष्कर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. 

अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे अध्यक्ष संजय भेडे, अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुशांत माने, सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. संतोष म्हस्के, ऑल इंडिया स्टुडंटस असोसिएशनचे (आइसा) उपाध्यक्ष प्रशांत निकम, भारत मुक्ती युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल माने, भारत मुक्ती मोर्चाचे कुमार काळे, बाजीराव मानव, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: kaikadi Society akrosh rally