‘कलाग्राम’मध्ये साकारणार विविध आविष्कार

सिंहगड रस्ता - पु. ल. देशपांडे उद्यानालगत साकारणाऱ्या ‘कलाग्राम’मधील खुल्या रंगमंचाचे नियोजित रेखाचित्र.
सिंहगड रस्ता - पु. ल. देशपांडे उद्यानालगत साकारणाऱ्या ‘कलाग्राम’मधील खुल्या रंगमंचाचे नियोजित रेखाचित्र.

पुणे - पारंपरिक कलांचे सादरीकरण, हस्तकलेच्या वस्तूंची खरेदी आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. अनोखे ‘कलाग्राम’ पु. ल. देशपांडे उद्यानालगत होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा कायमस्वरूपी प्रकल्प होणार आहे. 

शहर, जिल्ह्यातील कलाकारांबरोबरच देशविदेशातील कलाकारांना कला सादर करण्यासाठी आणि विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पाचा आराखडा आरेखनकार शोभा भोपटकर यांनी केले असून, त्यासाठी दिल्लीतील प्रीतमपूर आणि जनकपुरी या दोन्ही ठिकाणच्या ‘दिल्ली हाट’ प्रकल्पांचा विशेष अभ्यास केला होता. येत्या दोन वर्षांत तो  पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी २ कोटी रुपये माधुरी मिसाळ यांच्या विशेष आमदार निधीतून, ७५ लाख रुपये खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून, तर १ कोटी रुपये नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून अशी सुमारे चार कोटी रुपयांची सुरवातीची तरतूद या प्रकल्पासाठी केली आहे. उर्वरित तरतूद स्मार्ट सिटीच्या सहकार्याने होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सहा वर्षे पाठपुरावा सुरू होता, अशी माहिती माधुरी मिसाळ यांनी पत्रकाद्वारे दिली.

नृत्य-संगीतासाठी ‘ओपन थिएटर’
‘कलाग्राम’मध्ये हस्त कलावस्तूंची दालने उभारली जाणार आहेत. या ठिकाणी कलाकृती खरेदी करता येतील, तसेच कारागिरांचे प्रत्यक्ष कामही पाहता येईल. नृत्य-संगीतासाठी ‘ओपन थिएटर’ कलाग्राममध्ये असेल. विविध राज्यांमधील खाद्यपदार्थांची दालनेही या ठिकाणी असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com