‘यक्षप्रश्न’ जेतेपदावर कलमाडी शाळेची मोहर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

‘भाषा’ संस्थेच्या ‘यक्षप्रश्न’ या राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धेत यंदा डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलने विजेतेपद पटकावले आहे. तसेच, सिंबायोसिस हायस्कूल आणि एम. आय. टी विश्वशांती गुरुकुल स्कूलने (कोथरूड) अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळवले.

पुणे - ‘भाषा’ संस्थेच्या ‘यक्षप्रश्न’ या राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धेत यंदा डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलने विजेतेपद पटकावले आहे. तसेच, सिंबायोसिस हायस्कूल आणि एम. आय. टी विश्वशांती गुरुकुल स्कूलने (कोथरूड) अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळवले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यंदा ‘छत्रपती शिवाजी महाराज : जीवन आणि कार्य’ या विषयावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण बी. जी. शिर्के ग्रुपचे वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. सूर्यवंशी आणि घनकचरा व्यवस्थापन अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रश्नमंजूषेत राज्यातील ३६ शालेय संघांनी भाग घेतला होता. भारतीय विद्याभवनचे सुलोचना नातू विद्यामंदिर, मुक्तांगण इंग्लिश स्कूल व सरहद स्कूल (कात्रज) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. 

किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे व अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘मराठी भाषा ऑलिंपियाड’ परीक्षेत राज्यभरातील विशेष गुणवत्तापदकप्राप्त विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalmadi school stamp on winning the question

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: