#KalpWriksh कल्पवृक्ष नारळाची दुनियाच न्यारी

KalpWriksh
KalpWriksh

वडगाव शेरी - नारळाचे झाड बहुपयोगी असल्याने त्याला आपण कल्पवृक्ष म्हणतो; परंतु त्याही पुढे जाऊन, आपण कल्पना करणार नाही अशा दुनियेची अनोखी सफर आपणास घडते ती सुधाकर गायकवाड यांच्या घरी. पक्षी, प्राणी, मंदिर, चर्च ते अगदी आदिवासी लोकजीवन अन्‌ पारंपरिक व्यवसाय ते आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा दाखवणाऱ्या शेकडो वस्तू पाहून आपण तोंडात बोट घालतो आणि हे सगळे नारळापासून बनले आहे यावर विश्वासच बसत नाही.

वडगाव शेरीतील वाढेश्वरनगर येथे सुधाकर गायकवाड आणि कुटुंबीय राहतात. व्यवसायाने मोटार मॅकेनिक. गायकवाड गॅरेजवाले म्हणून हडपसर भागात प्रसिद्ध. मात्र कलाकार म्हणून आणखी एक ओळख येथे आल्यावरच होते.  दारातील नारळाच्या झाडावरून पडलेली एक न एक काडी, पान, तुरा, फुले, गळून पडलेले कोवळे नारळ, साल, करवंट्या, नारळाच्या शेंड्या या सगळ्या वस्तू जणू सुधाकर गायकवाड यांना खुणावतात, अन्‌ जागा होतो एक कलावंत. या वस्तू वाळवून, त्याला घासून, पुसून आणि रंग देऊन त्या जोडल्या की मग शेकडो आकार जन्म घेतात. 

गायकवाड यांच्या घरातील पहिल्या मजल्यावर हॉल भरेल इतक्‍या वस्तू त्यांनी बनवल्या आहेत. मंदिर, चर्च, विविध होड्या, नाव, जहाज, आदिवासी जीवनशैली दाखवणारे प्रसंग शिल्प, मच्छर, झुरळापासून अगदी गरुड, बगळे, कोंबड्यांची पिले इतकेच नव्हे तर वारकरी पाहिले की आपण थक्क होतो. विविध फुलदाण्या, कॉर्नर पीस, वॉल पीस, टेबल पीस ते अगदी सहज साकारतात. हा छंद गायकवाड निवृत्त झाल्यानंतर खरा फुलला. त्यांची सहचारिणी मार्था आणि दोन मुले त्यांना हा छंद जोपासण्यासाठी मदत करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com