कामगार भूषण पुरस्‍कारासाठी विजय पिसे यांची निवड

कामगार भूषण पुरस्‍कारासाठी विजय पिसे यांची निवड

पुणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिले जाणारे कामगार भूषण पुरस्कार आणि गुणवंत कामगार पुरस्कार (2017 ) जाहीर झाले आहेत. कामगार भूषण पुरस्‍कारासाठी विजय भूपाल पिसे यांची तर गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी 53 जणांची निवड करण्यात आली आहे.

साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन अआदी क्षेत्रातील योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात.

 कामगार भूषण पुरस्कार जाहीर झालेले विजय पिसे हे किर्लोस्करवाडी जिल्हा सांगली येथील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी आहेत. पंचवीस हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी पंधरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र दिले जाते. पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती कामगार कल्याण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी मनोज बागले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com