कमला नेहरू रुग्णालयात ‘आयसीयू’ला अखेर मुहूर्त

ICU
ICU

पुणे - महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता कक्ष (आयसीयू) सुरू करणे तब्बल दहा वर्षे आरोग्य विभागाला शक्‍य झाले नाही. अखेर आता खासगी संस्थेच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर ‘आयसीयू’ सुरू करण्यास मुहूर्त मिळाला आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. 

मंगळवार पेठेत महापालिकेने ३९ कोटी रुपये खर्च करून कमला नेहरू रुग्णालयाची मोठी इमारत उभी केली. तेथे ‘आयसीयू’ सुरू करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला; पण ‘आयसीयू’ सुरू झाला नाही. विकत घेतलेल्या मशिन बंद खोलीत धूळ खात पडून आहेत. महापालिका एकीकडे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना साधा ‘आयसीयू’ गेल्या दहा वर्षांपासून सुरू करता आली नाही, याविषयी ‘सकाळ’ने ८ सप्टेंबर रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. 

महापालिका प्रशासनाने खासगी संस्थांकडून ‘आयसीयू’ सुरू करण्यासाठी अर्ज मागविले होते. त्यामध्ये डॉ. सॅम्स मेडिकल कन्सल्टन्सी या संस्थेने सर्वांत कमी दराने म्हणजे केंद्र सरकारच्या सीजीएसएच दरापेक्षा एक टक्का कमी दराने उपचार करण्याची तयारी दाखवली. हा प्रस्ताव स्थायी समितीला पाठविला असता, त्याला मंजुरी देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com